MI vs SRH IPL 2021 Match 9: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करून सनरायझर्स हैदराबादपुढे (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 151 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. अशास्थितीत गेतविजेत्या मुंबई गोलंदाजांपुढे आता पुन्हा एकदा छोट्या धावसंख्येचा बचाव करण्याचं मोठं आव्हान आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) सर्वाधिक 40 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड (Kieron Pollard) 35 धावा आणि कृणाल पांड्या 6 धावा करून नाबाद परतले. पोलार्डने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या ओव्हरमध्ये 17 धावा लुटल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, हैदराबादसाठी मुजीब उर रहमान आणि विजय शंकर (Vijay Shankar) यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या तर खालील अहमदने 1 गडी बाद केला.
17 runs off the final over as #MumbaiIndians get to a total of 150/5.#SRH chase coming up shortly. Stay tuned!https://t.co/oUdPyW0t8T #MIvSRH #VIVOIPL pic.twitter.com/LEBYLBfA5R
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)