Mayank Markande Stunning Catch: आयपीएल 2024 चा (IPL 2024) तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत केकेआरने 16 सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद संघाने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मयंक मार्कंडेयने स्फोटक रमणदीप सिंगला बाद करत हवेत उडत अप्रतिम झेल घेतला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केकेआरची पाचवी विकेट 13व्या षटकात 105 धावांवर पडली. तुफानी फलंदाजी करणारा रमनदीप सिंग 17 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि 4 षटकार मारले.
पाहा व्हिडिओ
That Catch 👏
Mayank Markande holds on well to dismiss the explosive Ramandeep Singh
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱
Match updates ▶️ https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/T8meaNfFQ8
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)