'छोटी बच्ची हो क्या...' हा टायगर श्रॉफचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग मीम बनला आहे. 29 एप्रिलला टायगरचा 'हिरोपंती 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे चाहत्यांनी टायगरचा पहिला चित्रपट हिरोपंतीचा डायलॉग 'छोटी बच्ची हो क्या' व्हायरल केला. तो आता इतका व्हायरल झाला आहे की, अनेक लोक या डायलॉगवर व्हिडीओ बनवत आहेत. या डायलॉगची क्रेझ पाहता लखनऊ सुपर जायंट्सचे परदेशी खेळाडूदेखील स्वतःला आवरू शकले नाहीत व त्यांनी देखील अगदी देसी स्टाईलमध्ये डायलॉग म्हटला आहे. सध्या या खेळाडूंचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)