आयपीएल 2023 (IPL 2023) चा 58 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात 3.30 वाजता सुरु होणार आहे. जिथे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यासमोर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामचे आव्हान आहे. आता कृणाल-मार्कराम बालेकिल्ल्यात विजयी होणार की त्यांना निराश होऊन परतावे लागणार हे पाहायचे आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. तसेच हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)