Ireland Women vs India Women Score Update: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळला जात आहे. आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसने (Gaby Lewis)नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या पिचवर असलेल्या गॅबी लुईस आणि लिया पॉल दमदार कामगिरी करत आहे. दोघींनी अर्धशतके झळकावली आहेत. लिया पॉलने (Lia Paul) 70 चेंडूत 58 धावा केल्या आहेत. तर कर्णधार गॅबी लुईसने 113 चेंडूत 80 धावा केल्या आहेत. सध्या आयर्लंडची धावसंख्या 173/4 (38) अशी आहे. येथे पहा सामन्याचे लाईव्ह स्कोअर कार्ड
लिया पॉलचे दमदार अर्धशतक
A solid half-century for Leah Paul, coming in 58 balls! 🔥#INDvIRE pic.twitter.com/Ws19bBZeD5
— Women’s CricZone (@WomensCricZone) January 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)