भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) हॅट्ट्रिक (Hat-trick) साधली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (25 सप्टेंबर) 27 वर्षीय डावखुरा चायनामन गोलंदाजाने 47व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये विकेट्स घेतल्या. लोगन व्हॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत त्याने ही कामगिरी केली. कुलदीपच्या या हॅट्ट्रिकची आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद होणार नाही, पण एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने दोनदा अशी कामगिरी केली आहे.
HAT-TRICK! Kuldeep Singh Yadav (10.0-51-4) New Zealand A 219/10 #IndAvNzA #IndiaASeries
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)