Krunal Pandya Son: भारतीय क्रिकेटपटू कृणाल पांड्या (Krunal Pandya) दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी पंखुरी शर्मा पांड्याने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. पांड्या दुस-यांदा मुलगा झाल आहे. कृणाल पांड्याने त्याची पत्नी पंखुरी शर्मा, पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा यांच्यासोबतचा एक सुंदर कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांचा दुसरा मुलगा 21 एप्रिल 2024 रोजी जन्माला आला. या जोडप्याने त्याचे नाव वायु कृणाल पांड्या ठेवले आहे. (हे देखील वाचा: KKR vs PBKS, IPL 2024 Head to Head: कोलकाता-पंजाब यांच्यात कुणाचे आकडे भारी? दोघांपैकी कोण सरस? एका क्लिकवर घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)