इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 27 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. मनदीप सिंग 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 50/4.
Top of middle stump!@akshar2026 knocks the stumps to dismiss Mandeep Singh.
Follow the match ▶️ https://t.co/CYENNIiaQp #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/if3n3vnIJ3
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)