IND vs PAK T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे. भारत-पाक सामन्याबाबत दोन्ही संघातील खेळाडू आणि चाहत्यांचा उत्साह प्रचंड आहे. आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमबाबत वादग्रस्त विधान समोर आले आहे. वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) अनेकदा टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी (Virat Kohli) तुलना केली जाते. बाबरला पाकिस्तानचा कोहली म्हणतात. या दोघांच्या तुलनेवरून अनेकदा दोन्ही देशांचे चाहते सोशल मीडियावर भांडताना दिसतात. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने बाबर आझमबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दानिश कनेरिया म्हणाला की, बाबर आझमने शतक झळकावताच दुसऱ्याच दिवशी तुम्ही त्याची विराट कोहलीशी तुलना करायला लागतात. 'खर तर बाबर विराटच्या बूटाच्या बरोबरीचा ही नाही'. अमेरिकेच्या गोलंदाजांनी त्याला पायचीत केले. तो गोलंदाजांना खेळूही शकला नाही. असे विधान त्याने केले आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)