भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test Series 2024) 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.  या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) हा यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही तर एक फलंदाज म्हणून खेळणार आहे असे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सांगितले. खेळाचा फॉरमॅट आणि पिचची कन्डिशन पाहुन हा निर्णय घेतल्याचे द्रविडने सांगितले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)