IND vs BAN 1st Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाने फॉलोऑन केला नाही. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 बळी घेतले. तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 36 धावा केल्या आहेत. केएल राहुल 16 धावांवर नाबाद आहे तर शुभमन गिल 15 धावा करत राहुलला साथ देत आहे. टीम इंडियाची एकूण आघाडी आता 290 धावांची आहे.
LUNCH: Rahul, Gill start steadily as India's lead inches towards the 300-run mark#BANvIND https://t.co/GvBueP1PBi
— Cricbuzz (@cricbuzz) December 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)