न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलच्या (IPL) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. आपल्या दुखापतीनंतर केन विल्यमसन आता न्यूझीलंडला पोहचला आहे. यावेळी एअरपोर्टवरुन बाहेर पडताना कुबड्यांच्या आधारे चालताना दिसला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांने आपण निराश असून गुजरात संघाने चागली मदत केल्याचे म्हटले आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH: Hear Kiwi cricketer Kane Williamson's first comments as he touches down in NZ, after a knee injury cut short his @IPL campaign https://t.co/j8QZegWvcu (Via @AlexChapmanNZ) pic.twitter.com/5GUnkugHXa
— Newshub (@NewshubNZ) April 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)