IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये भारतीय संघ विजयी झाला. चौथ्या कसोटी सामन्यात आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रूटने 219 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंड संघाची धावसंख्या 282/7 आहे.
Most Test centuries against India:
Joe Root: 10
Steve Smith: 9
Garry Sobers: 8
Viv Richards: 8
Ricky Ponting: 8#INDvENG pic.twitter.com/bfcyozw8Ns
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)