हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 28व्या मॅचमध्ये सनरायझर्सचा गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांना चकित केले. उमरान 20व्या षटकातील दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेत प्रकाश झोतात आला. उमरानच्या शानदार गोलंदाजीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी कौतुक केले. थरूर ट्विट करून म्हटले की, “आम्हाला त्याच्या भारतीय संघात समावेश करण्याची गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. त्याच्या प्रतिभेचा वेळीच फायदा घ्या. त्याला कसोटी सामन्यातील हिरव्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी इंग्लंडला घेऊन जा. त्याने आणि बुमराहने एकत्र गोलंदाजी केली तर ब्रिटिश घाबरतील.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)