IPL 2022, PBKS vs RR Match 52: जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) आयपीएलच्या  (PL) 2022 हंगामातील पहिले अर्धशतक 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. ब्रिटिश खेळाडूसाठी ही खेळी त्याच्यासाठी महत्त्वाची होती, कारण या मोसमात तो आतापर्यंत मधल्या फळीत धावा करण्यात संघर्ष करत होता. दरम्यान 13 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा (Punjab Kings) स्कोर 2 बाद 109 धावा आहे. बेअरस्टोच्या आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे अर्धशतक ठरले आहे. बेअरस्टो 50 तर कर्णधार मयंक अग्रवाल 13 धावा करून खेळत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)