IPL 2022, MI vs LSG Match 26: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टायलिश कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने कारकिर्दीतील आपले तिसरे आणि हंगामातील पहिले शतक ठोकले आहे. राहुलने आपल्या शतकी खेळीत 56 चेंडू खेळले आणि 9 चौकार व 5 षटकार मारून मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. लखनौने टायटल मिल्सच्या (Tymal Mills) 19 व्या षटकांत 18 धावा काढल्या. लक्षणीय आहे की या वर्षी मुंबईविरुद्ध शंभरी पल्ला गाठणारा राहुल हा राजस्थानच्या जोस बटलर (Jos Buttler) नंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे दुसरे शतक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)