IPL 2022, MI vs LSG Match 26: कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants)हंगामातील आपली सर्वोत्तम धावसंख्या गाठली आणि निर्धारित 20 षटकांत चार बाद 199 धावांचा डोंगर उभारला. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला विजयासाठी धावांचे टार्गेट मिळाले आहे. लखनौकडून राहुल 60 चेंडूत 103 धावा करून नाबाद राहिला. तसेच मनीष पांडेने 38 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईचे गोलंदाज आजही लयीत दिसले नाही. जयदेव उनाडकटने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मुरुगन अश्विन आणि फॅबियन एलनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
LSG 199/4 in 20 overs.
Bhaukaal ho toh aisa ho! 🔥🔥
KL Rahul 103*(59) | Manish Pandey 38 (29)
Kaisi lagi apni ballebaazi? 😍#AbApniBaariHai💪#IPL2022 #MIvsLSG
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)