IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये जोरदार पुनरागमन केलं आणि टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 षटकांत 6 बाद 170 धावांत रोखले. विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी अर्धशतकी खेळी करून संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता, पण मधल्या फळीच्या अपयशामुळे संघ सन्मानजनक धावसंख्याच गाठू शकला. विराटने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर पाटीदारने 52 आणि ग्लेन मॅक्सवेलने 33 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) दोन विकेट घेऊन गुजरातचा यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच मोहम्मद शमी, राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Virat Kohli back amongst the runs. ✅
Maiden half-century for Patidar. ✅
Quick fire innings from Maxi and Lomror at the death. ✅
Time for our bowlers to lead the charge from ball 1️⃣. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #GTvRCB pic.twitter.com/F5yqSD9Nl8
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)