IPL 2022 Final: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) रविवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 फायनलमध्ये दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरला (David Warner) मागे टाकून आयपीएलच्या (IPL) हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. बटलरने वॉर्नरला मागे टाकले, ज्याने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 848 धावा केल्या. बटरलने गुजरातविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या डावात 22 धावा करताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या नंबर 1 विदेशी फलंदाजाला मागे टाकले. बटलर आता विराट कोहली (Virat Kohli) नंतर 850 धावा पार करणारा दुसरा फलंदाज ठरला. भारताच्या माजी कर्णधाराने 2016 मध्ये 16 डावात विक्रमी 973 धावा करून आतापर्यंत अबाधित असा पराक्रम केला होता. (IPL 2022 Final, GT vs RR: हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचे ‘राजवाडी’ हतबल, गुजरातसमोर 131 रन्सचे टार्गेट)

बटलरने आपल्या खळबळजनक फॉर्मने एकाच सत्रात कोहलीच्या चार शतकांच्या संख्येशी बरोबरी केली आहे. इंग्लिश खेळाडूने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान हा पराक्रम केला, जिथे त्याने 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 86 चेंडूत 106 धावा केल्या. बटलरचे हंगामातील पहिले शतक मुंबई इंडियन्स (100) विरुद्ध आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (103) व दिल्ली कॅपिटल्स (116) विरुद्ध शतके झळकावली. दुसरीकडे, बटलरने एका मोसमात सर्वाधिक 122 चौकार मारण्याचा कोहलीचा विक्रमही मोडला आणि सध्या या मोसमात त्याच्या नावावर 127 चौकार आहेत. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी वॉर्नरचा विक्रम मोडण्यासाठी बटलरला 25 धावांची गरज होती. गुजरातविरुद्धच्या एका डावात 25 धावा करताच त्याने एका मोसमात 848 धावा करण्याचा वॉर्नरचा विक्रम मोडला. यानंतर, तो आता आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

आयपीएल जेतेपदाच्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या पहिल्या सत्रातच चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जर त्यांनी हे विजेतेपद जिंकले तर ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी असेल. त्याचवेळी 2008 च्या पहिल्या सत्रात विजेतेपद पटकावल्यानंतर राजस्थानचे दुसऱ्यांदा जेतेपदावर असेल. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात बटलर 35 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले, पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. त्याचा स्ट्राइक रेट 111.43 राहिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)