IPL 2022, DC vs LSG Match 45: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) निर्धारित 20 षटकांत 3 बाद 195 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) समोर विजयासाठी 196 धावांचे भव्य आव्हान ठेवले आहे. लखनौच्या या विशाल धावसंख्येत कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 77 धावा केल्या. तर दीपक हुडाने (Deepak Hooda) 52 धावांची शानदार खेळी केली. तसेच क्विंटन डी कॉकने 23 धावा आणि मार्कस स्टोइनिसने 17 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीकडून शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) सर्व तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)