IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पंजाब किंग्जला (Punjab Kings) 6 विकेट्सने पराभूत केले आणि त्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणखी एक नवोदित क्रिकेटपटू, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याशी चर्चा करताना धोनी आणि शाहरुखचा फोटो आयपीएलच्या (IPL) अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला गेला जो बघताच यूजर्समध्ये व्हायरल झाला. फोटोमध्ये महेंद्र सिंग धोनी दुसर्‍या भारतीय प्रतिभेला काही मौल्यवान टिप्स देताना दिसून येत आहे आणि शाहरुख तो फार काळजीपूर्वक ऐकत असल्यासारखा दिसत होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)