भारत आणि इंग्लंड महिला संघांमधला दुसरा एकदिवसीय सामना कॅंटबरी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार एमी जोन्सने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने यजमानांसमोर 334 धावांचे लक्ष्य ठेवले. कौरने 111 चेंडूंत 18 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 143 धावांची नाबाद खेळी खेळली. शिवाय हरलीन देओलने 58 धावांची खेळी खेळली. भारताने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 333 धावा केल्या. वनडे क्रिकेटमधील टीम इंडियाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
Harmanpreet Kaur smashes 143* as India post their highest ODI total against England
333/5 in 50 #INDvENG
Summary 👉https://t.co/Hb5zYQ1kFS pic.twitter.com/fSD2AwJ3hw
— Cricbuzz (@cricbuzz) September 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)