IND vs BAN 1st: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 387 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 9 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या आणि 2 बाद 258 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 150 धावा केल्या तर दुसऱ्या डावात बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. नजमुल हसन शांतो 156 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. उमेश यादवच्या चेंडूवर विकेटकीपर ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला.
Umesh Yadav with the breakthrough! ?
A relay catch between Virat and Pant breaks the partnership.
Najmul Hossain Shanto departs.
Live - https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/9OAwvc2Gw3
— BCCI (@BCCI) December 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)