आयसीसी विश्वचषक 2023 च्या 21व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ आज आमनेसामने आहेत. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोणत्या संघाचा विजय रथ थांबणार हे पाहणे विशेष ठरणार आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंड संघाने भारतासमोर 274 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्युझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र 75 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 274 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला चौथा मोठा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 182/4
CWC2023. WICKET! 32.1: K L Rahul 27(35) lbw Mitchell Santner, India 182/4 https://t.co/MrCP495zvG #INDvNZ #CWC23
— BCCI (@BCCI) October 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)