भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला असून, पंतच्या जागी भुवनेश्वर खेळत आहे. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 विकेट्सने पराभव करून मालिकेत आघाडी घेतली.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, (कर्णधार) विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)