IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिका आपल्या नावावर करू इच्छितो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे आणि टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याची आशा जिवंत ठेवायची आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
बांगलादेश: झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), यासिर अली, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, इबादत हुसेन.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bat against Bangladesh in the first #BANvIND Test.
Follow the match ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/Ort4uAbIUn
— BCCI (@BCCI) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)