टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राउंड-4 च्या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ या दिग्गजांसह मैदानात उतरले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा.
बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदयॉय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
🚨 Toss & Team News 🚨
Captain @ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Bangladesh.
A look at our Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/OHhiRDZM6W #AsiaCup2023 | #INDvBAN pic.twitter.com/SD6uyPHud3
— BCCI (@BCCI) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)