IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव करत लंकेच क्लिन स्वीप केला आहे. तत्तपुर्वी, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 137 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने 39 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून महेश थेक्षानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला श्रीलंकेचा संघ 20 षटकात आठ विकेट गमावून 137 धावा करु शकला त्यामुळे सामना सुपर ओव्हर गेला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकाने भारतासमोर अवघ्या तीन धावांचे लक्ष्य दिले आणि भारताने ते सहज गाठले.
3⃣-0⃣ 🙌@Sundarwashi5 with a 'super' over and Captain @surya_14kumar with the winning runs! 😎
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#SLvIND pic.twitter.com/KoNf4OFJHq
— BCCI (@BCCI) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)