India vs Sri Lanka Schedule 2024: भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 26 जुलैपासून सुरू होणार आहे, तर एकदिवसीय मालिका 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. टी-20 मालिका पल्लेकेले येथे खेळली जाईल, तर एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली नियुक्ती असेल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 26 जुलै रोजी पल्लेकेले येथे होणार आहे. दुसरा टी-20 सामना 27 जुलैला आणि तिसरा सामना 29 जुलैला होणार आहे. एक दिवसीय मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्ट, दुसरा सामना 4 ऑगस्टला तर तिसरा सामना 7 ऑगस्टला होणार आहे. हे तिन्ही सामने दुपारी अडीच वाजता सुरू होतील.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. वृत्तानुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दौऱ्यावर जाणार नाहीत. याशिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार असेल, तर केएल राहुलकडे वनडे संघाची कमान सोपवली जाईल, असे वृत्त आहे, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. (हेही वाचा: Indian Racing Festival: टीम इंडियाचे कोच सौरव गांगुली याने कोलकाता रॉयल टायगर्स संघ विकत घेतला)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)