IND vs PAK T20 World Cup 2024: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकाचा (ICC World Cup 2024) पुढील हंगाम 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेसाठी सध्या काही महिने बाकी आहेत, मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची क्रिकेटप्रेमी नेहमीच वाट पाहत असतात. ही चकमक एखाद्या मोठ्या स्पर्धेत झाली तर सामन्याचा उत्साह द्विगुणित होतो. द गार्डियनच्या वृत्तानुसार, यावेळी भारत आणि पाकिस्तानचे संघ न्यूयॉर्क शहरात आमनेसामने येणार आहेत. आगामी स्पर्धेसाठी दोन्ही संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ युवकांमध्ये सातत्याने प्रयोग करत आहे. त्यामुळेच अनुभवी खेळाडू काही काळापासून मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सहभागी होत नाहीत. (हे देखील वाचा: IND vs SA 3rd T20I: क्षेत्ररक्षण पदक पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये, पण यावेळी नव्या अवतारात (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)