ज्या शानदार सामन्याची क्रिकेट चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो आता सुरु झाला आहे. आशिया कप 2022 मध्ये भारत पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना दुबईत होत असून, त्यासाठी दोन्ही संघ गेल्या चार दिवसांपासून जोरदार तयारी करत आहेत. गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन-

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनबाज दहनी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)