India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारताचा पहिला डाव 262 वर आटोपला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली तर एजाज पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर भारताकडे 28 धावांची आघाडी होती. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकांत कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. यानंतर डेव्हन कॉनवे आणि विल यंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतू कॉनवे सुंदरने 22 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. डॅरेल मिचेल आणि विल यंगने चांगली भागिदारी केली. पंरतू डॅरेल मिचेलला (21) जाडेजाने बाद केले यांनतर फलंदाजीला आलेल्या टॉम ब्लूडंललाही (4) जाडेजाने स्वस्तात बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेला ग्लिन फिलीप्सने आक्रमक फलंदाजी केली. अश्विनने त्याला 26 धावांवर बाद केले.
पाहा पोस्ट -
𝗧𝗜𝗠𝗕𝗘𝗥! 🎯
R Ashwin strikes to dismiss Glenn Phillips 👌 👌
New Zealand 6 down!
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mfSCUEc9iu
— BCCI (@BCCI) November 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)