भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. केएल राहुलने सुरूवातीला तर सूर्यकुमार यादवने अखेरपर्यंत चांगली खेळी केली. दोघांनी अर्धशतके झळकावली. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने सामन्याच्या शेवटी काही अविश्वसनीय शॉट्स मारले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले.
Unstoppable SKY 👊
79 runs in last 5 overs propels India to a solid total 👏#T20WorldCup | #ZIMvIND |📝: https://t.co/SFsHINI2PL pic.twitter.com/p8CMwPkQXL
— ICC (@ICC) November 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)