India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने यजमानांवर आपली पकड घट्ट केली होती. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, लंच ब्रेक नंतर भारताला दुसऱ्या डावात तिसरा धक्का लागला आहे. यशस्वी जैस्वाल 161 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 313/3
1ST Test. WICKET! 93.5: Yashasvi Jaiswal 161(297) ct Steven Smith b Mitchell Marsh, India 313/3 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)