भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठी बातमी मिळाली आहे. खरं तर, 9 जून 2023 रोजी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Final) भारत पात्र ठरला आहे. आता संघाची स्पर्धा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने ही कामगिरी केली आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेला केवळ 53 टक्के गुण आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना खेळण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य होते. पण क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात केन विल्यमसनच्या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंडने विजय मिळवत श्रीलंकेच्या आशा धुळीस मिळवल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)