IND vs SL 2nd T20I: आज, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकाने 20 षटकात नऊ गडी गमावून 161 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुशल परेराने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर दुसरीकडे, भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दरम्यान, पावसामुळे भारताला 8 षटकांत 78 धावा करण्याचे नवे लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडियाच्या डावात आतापर्यंत तीन चेंडू झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 6 धावा केल्या आहेत.
Updated Playing Conditions:
Resumption of Play: 10.45 PM IST
Overs: 8
Target for #TeamIndia: 78#SLvIND https://t.co/YwjBwpb0B4
— BCCI (@BCCI) July 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)