भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील त्यांच्या पाचव्या सामन्यात शनिवारी गतविजेत्या बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आणि त्यानंतर बांगलादेशला 20 षटकात 7 गडी गमावून 100 धावांवर रोखले. बांगलादेशकडून निगार सुलतानाने 36, फरगाना हकने 30 आणि मुर्शिदा खातूनने 21 धावा केल्या. भारतातर्फे शफालीने चार षटकांत केवळ 10 धावा देत 2 बळी घेतले. दीप्ती शर्माने 4 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि दोन यश मिळाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)