विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखुन बांगलादेशचा पराभव करत विश्वचषकात विजयाच चौकार लगावला. त्ततपुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बांगलादेशकडून तनजीद हसन 51, लिटन दास 66 आणि महमुदुल्ला 46 यांनी सर्वाधिक धावा केल्या आहे. भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 41.3 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 103 नाबाद धावांचे शानदार शतक झळकावले. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंडसोबत रविवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)