IND-W vs WI-W, Women's World Cup: स्मृती मंधाना-दीप्ती शर्मा यांची चमकदार खेळी, भारताने दुसऱ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा 81 धावांनी उडवला धुव्वा

महिला विश्वचषकच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मंगळवारी वेस्ट इंडिजचा 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून विंडीज महिला संघाविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी दमदार अर्धशतके ठोकली. भारतीय महिलांचा डाव 258 धावांत आटोपला. यांनतर गोलंदाजांनी आक्रमक खेळ करून संघाला वर्ल्ड कपपूर्वी आश्वासक सुरुवात करून दिली.

IND-W vs WI-W, Women's World Cup: स्मृती मंधाना-दीप्ती शर्मा यांची चमकदार खेळी, भारताने दुसऱ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा 81 धावांनी उडवला धुव्वा
भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Women's World Cup 2022: भारतीय महिला संघाने (India Women's Cricket Team) मंगळवारी वेस्ट इंडिजच्या महिलांचा (West Indies Women) 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे भारताने वनडेत सलग तिसरा विजय नोंदवला. फलंदाजी विभाग क्लिनिकल होता आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी केली. पूजा वस्त्राकरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तत्पूर्वी, टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकून विंडीज महिला संघाविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांनी दमदार अर्धशतके ठोकली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2022 11:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).