IND vs SL 3rd T20I: मैदानात उतरताच ‘हिटमॅन’च्या नावावर सर्वात मोठा विक्रम, पाकिस्तानी दिग्गज खेळाडूला मागे टाकून यादीत बनला नंबर 1 क्रिकेटपटू
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक सर्वकालीन विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरताच झटपट क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक सामने खेळाडू बनला आहे. शर्माने रविवारी 125 वा टी-20 खेळून एलिट यादीत पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकला मागे टाकले. रोहित हा एकमेव भारतीय आहे ज्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.
IND vs SL 3rd T20I: रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या 125व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरला आणि त्याने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकला (Shoaib Malik) टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (Most Capped T20 Players) खेळणाऱ्या यादीत मागे ढकलून नंबर 1 चे सिंहासन काबीज केले. भारतीय कर्णधार देशातील एकमेव खेळाडू आहे ज्याने 100 पेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Matches - 125
Runs - 3308
Average - 32.75
Hundreds - 4
Rohit Sharma overtakes Shoaib Malik to become the most capped player in men's T20Is 👏🔥#India #RohitSharma #INDvSL #Cricket pic.twitter.com/zICpxOMj1K
— Wisden India (@WisdenIndia) February 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

