गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून भारत-पाकिस्तान यांच्यात महामुक्ला रंगणार आहे. दोन्ही संघांमधील सामन्यापूर्वी स्टेडियम उडवण्याच्या धमकीमुळे संपूर्ण स्टेडियमला छावणीचे स्वरूप आले आहे. स्टेडियमच्या आत आणि बाहेर फक्त सुरक्षा कर्मचारीच दिसतात. राज्य केडीजीपी विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान गुजरात पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 6000 पोलीस अहमदाबाद आणि नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तैनात केले जातील.
खरं तर, अलीकडच्या काळात बीसीसीला धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
VIDEO | Security heightened outside Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat ahead of today's India vs Pakistan World Cup match.#ICCCricketWorldCup23 #IndiaVsPakistan pic.twitter.com/HDsHIGhM3g
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2023
#WATCH | Gujarat: Security beefed up outside Narendra Modi Stadium ahead of the India Vs Pakistan ICC Cricket World Cup match in Ahmedabad today pic.twitter.com/AR1d4lBoE7
— ANI (@ANI) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)