न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या दुसर्‍या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये 7500 धावा करणारा 9वा वेगवान फलंदाज ठरला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीने महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहली आणि गावस्करांनी 154 डावात 7500 कसोटी धावांचा टप्पा गाठला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)