India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने 38 षटकांत 7 गडी गमावून 107 धावा केल्या आहे. रवींद्र जडेजा 11 धावा करून नाबाद आहे. वॉशिंग्टन सुंदर 2 धावा करून नाबाद आहे. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 4 बळी घेतले. त्याने 16 षटकात 36 धावा दिल्या आहेत. ग्लेन फिलिप्सने 2 बळी घेतले. टीम साऊदीला यश मिळाले आहे.
New Zealand spun a web around India's batters in Pune this morninghttps://t.co/3D1D83IgS1 #INDvNZ pic.twitter.com/vYoaOz0adv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)