IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENg 2nd Test) आजपासून सुरू होत आहे. भारतीय संघ सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड प्लेइंग-11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार.
India Won the Toss & elected to bat https://t.co/X85JZGt0EV #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)