भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. दरम्यान, चोथ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तत्तपुर्वी तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळी करत तीन विकेट्सच्या नुकसानावर 289 धावा केल्या. तर विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर खेळत आहे. टीम इंडिया अजूनही 191 धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
Of his maiden Test 💯 in India to making the most of batting at the Narendra Modi Stadium 🏟️
Presenting a conversation full of smiles 😃 ft. Ahmedabad centurion @ShubmanGill & @cheteshwar1 👍 - By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥🔽 #TeamIndia | #INDvAUShttps://t.co/IcCiO4Vuxc pic.twitter.com/uVEFurOl40
— BCCI (@BCCI) March 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)