भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांत गुंडाळला. रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करताना 5, तर अश्विनने 3 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, सामान्यादरम्यानच्या एका घटनेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेला उधाण आले आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन मीडिया, माजी कर्णधार टीम पेन आणि मायकेल वॉन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फॉक्स क्रिकेटने जडेजाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मोहम्मद सिराजशी बोलतो व त्याच्या हातातून काहीतरी मलम किंवा क्रीम घेताना दिसत आहे. त्यानंतर तो बॉलवर बोटे फिरवतानाही दिसत आहे. हे क्रीम त्याने बोटावर लावले की बॉलवर ते या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत नाही. मात्र यामुळे जडेजावर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप होत सोशल मिडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने ट्विट करत म्हटले की, ‘हा त्याच्या स्पिनिंग बोटावर काय लावत आहे? असे काही कधी पाहिले नाही.’

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)