भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)