महिला टी-20 विश्वचषकात (Women's T20 World Cup) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपसेट करत इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव केला. 26 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
Phenomenal Proteas! 👏 👏
History in Cape Town as South Africa go through to the final of the Women’s #T20WorldCup 🙌#ENGvSA | #TurnItUp pic.twitter.com/hqlNuRmims
— ICC (@ICC) February 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)