आयसीसी वनडे विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेत श्रीलंका संघाची खराब कामगिरी पाहायला मिळाली. या कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि याच बैठकीत श्रीलंका क्रिकेटला आयसीसी सदस्यत्वातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्य म्हणून श्रीलंकेवर नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: टीम इंडियाचे गोलंदाज विश्वचषकात करत आहे कहर, रंजक आकडेवारी देत आहे साक्ष; पाहा आकडेवारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)