ICC Women's Rankings: भारताची स्टार ओपनर शेफाली वर्मा आयसीसी T20 क्रमवारीत पुन्हा नंबर 1, स्मृति मंधानाची घसरण; पहा टॉप-10 रँकिंग
ICC Women's Rankings: दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध T20 मालिकेतून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मागे टाकत शेफाली वर्मा पुन्हा क्रमवारीत अव्वल स्थानावर आली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने ताज्या आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधानाला खाली ढकलून तिसरे स्थान पटकावले आहे.
ICC Women's Rankings: ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने (Meg Lanning) इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 44 चेंडूत 64 धावांच्या जोरावर भारताच्या स्मृती मंधानला (Smriti Mandhana) मागे टाकून तिसरे क्रमांकावर झेप घेतली आहे. तर मंधानाची सलामी जोडीदार शेफाली वर्मा (Shafali Verma) दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला (Beth Mooney) मागे टाकून क्रमवारीत अव्वल स्थानावर परतली आहे. वर्माने ICC महिला टी-20 विश्वचषक 2020 मध्ये प्रथमच अव्वल स्थान पटकावले होते.
🔹 Shafali Verma back on 🔝
🔹 Big gains for Chamari Athapaththu 🙌
Here are the movements in this week's @MRFWorldwide ICC Women's Player Rankings 📈
Details 👉 https://t.co/vgKLeRzB8D pic.twitter.com/Eh6A9fi7bj
— ICC (@ICC) January 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

